पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर.
पुणे : दिनांक १८/११/२०२२ रोजी हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४३९ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्याचा तपास मा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे आदेशान्वये वर्ग करुन घेवुन दाखल गुन्ह्याचा तपास श्री. गुंगा जगताप, पोलीस उप निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम सुरेश संभाजी वाघमारे, वय २८ वर्षे, रा. सोलापुर याने दाखल गुन्च्यातील हिरो स्प्लेंडर ही गाडी चोरलेली आहे. त्याप्रमाणे त्यास हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १४३९ / २०२२, भा.द.वि. कलम ३७९ या गुन्ह्यात दि. १८/११/२०२२ रोजी गाँजरी, हडपसर, पुणे येथून अटक केली आहे..
अटक मुदतीत त्याचेकडे तपास केला असता, त्याचेकडुन एकुण २० दुचाकी गाड्या व १ चारचाकी गाडी अशी एकुण २१ गाड्या किंगत रुपये ६,१७,०००/- ची हस्तगत करण्यात आलेली आहेत, वर नमुद आरोपी सुरेश संभाजी वाघमारे व त्याचा साथीदार व पाहिजे आरोपी बालाजी वाघमारे, रा. सोलापुर यांनी पुणे शहर व परिसरामधील गुन्हे केलेले आहेत.
२० दुचाकी व ०१ चारचाकी अशी एकुण २५ वाहने किंमत रुपये ६, १७,०००/- चा मुद्देमाल अटक आरोपी कडून जप्त करण्यात आला असून, एकूण २१ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत..
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री अमोल झें पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.र पोलीस उप निरीक्षक, गुंगा जगताप, पोलीस अंमलदार, अशोक आटोळे, विनायक रामाणे गणेश लोखंडे, शिवाजी जाधव यांनी केली आहे.

