✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
वर्धा:- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मंडळाने जाहीर केलेल्या तारखेनुसार बारावीची परिक्षा 21 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 2 मार्चला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आपल्या या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर केले आहे.
दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण टप्पा असतो. या परीक्षा पुढील जीवनाचा पाया बनते त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांन मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.