✒️ वाशिम जिल्हा प्रतिनिधी
वाशिम:- राज्य निवडणूक आयोगामार्फत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता नव्याने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आले असून ज्या युवकाचे – युवतीचे वय १ जानेवारी २०२२ पर्यंत १८ वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी मतदार यादीत नविन नावे नोंदवावेत तसेच नाव, पत्ता यांची दुरुस्ती व ज्यांचे नाव कमी करायचे आहे ते नावे कमी करता येईल असे आवाहन युवा मराठा न्युजचे मंगरुळपिर तालुका प्रतनिधी रितेश गाडेकर यांनी केले आहे.
ज्याचे नाव नव्याने मतदार यादीत नोंदवायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ६ चा फॉर्म भरावा. या साठी वयाच्या पुराव्यासाठी टीसी, आधारकार्ड,रहिवासी प्रमाणपत्र,पासपोर्ट फोटो,कुटुंबातील सदस्याचा नातेवाईकांचा मतदानाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.ज्यांना मतदान यादीतून नाव कमी करायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ७ हा फॉर्म भरावा,ज्यांना नाव व पत्याची दुरुस्ती करायची आहे त्यांनी नमुना क्रमांक ८ चा फॉर्म भरून अंगणवाडी सेविका यांच्याकडे व तहसील कार्यालयात दाखल करावेत व जास्तीत जास्त युवक – युवती व नवीन मतदारांनी भारतीय लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव नवीन मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावेत.असे आवाहन युवा मराठा न्युज मंगरुळपिर प्रतिनिधी रितेश गाडेकर यांनी १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक – युवती व नवीन मतदारांना केले आहे. नवीन नावे नोंदविण्या करीता जवळील अंगणवाडीतील सेविका किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन रितेश गाडेकर यांनी नवीन मतदारांना केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348