अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला:- शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील रुपचंद नगर मधील मुख्य रस्त्याकरीता सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगर पालिका आयुक्त कविता द्विवेदी यांना निवेदन देऊन हा रस्ता त्वरित करण्यात यावा या करीता मागणी करण्यात आली होती. त्यांच्या मागणिची दखल घेत प्रभाग क्रमांक 18 मधील रुपचंद नगर मधील रस्त्याला मंजुरी देत या रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
या रस्त्यावर मोठ मोठ्य खड्डे पडले असून नागरिकांना व शाळकरी मुला मुलींना यांचा नाहक त्रास सहन लागत होता. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नागरिकांना आता ये- जा करण्यासाठी त्रास होणार नाही. सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून प्रभाग क्रमांक 18 मधील रुपचंद नगर मधील नागरीकांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348