देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- अतिवृष्टी व परतीच्या पावसाने संकटग्रस्त झाल्याने खरीपासाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज माफ करा या प्रमुख मागणीला घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी हिंगणा तहसील कार्यालयासमोर दिनांक २५ नोव्हेंबर ला निदर्शने केली. या निदर्शनाअंती हिंगण्याच्या तहसीलदार मोहिने मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, परतीच्या पावसाचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या अशा मागण्यांसहित हिंगणा तालुक्यात क्रशर मशीन मुळे शेत पिकाच्या होणाऱ्या हानीकडे लक्ष देऊन कारवाई करा, कान्होली बाऱ्याला पुराच्या विळख्यात सतत ग्रासून टाकणाऱ्या कान्होलीनाला तलावाचा गाळ साफ करा, हिंगणा कान्होलीबारा व टाकळघाट कान्होलीबारा अशा रस्त्यांची दुरुस्ती करा या स्थानिक मागण्यांचाही समावेश करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना किसान सभेचे जिल्हा सचिव अशोक आत्राम म्हणाले की उद्या 26 नोव्हेंबरला संविधान दिवस असून उद्याच दोन वर्षांपूर्वी दिल्ली सीमेवर सुरू झालेल्या किसान आंदोलनाचे दुसरे वर्धापन वर्ष आहे. किसान आंदोलनाला केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अजूनही हमीभावाचा कायदा बनवण्यात आलेला नाही.
कार्यक्रमात अमोल धुर्वे कैलाश मडावी गोपिदास उईके पंजाब पुरके मृणाल सराटे धर्मराज इचकाटे विलाश अनकर अशोक कुकडकर विजय वरखाडे रमेश कोवे कृणाल मसराम विक्की नंदुरकर शुभम सराम शंकर परतेकि रुपचंद कोरसे अमृत कोरसे तुळसीराम बोटरे ब्रम्हानंद परतेकि पुंडलीक पुरके नरेश शेलघरे अवधुत कुकडे गोविंदा आत्राम भगवान जुनघरे गजानन जुनघरे बिळकृष्णा उईके सचिन ढोढरे अर्जुन पंधराम यांची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

