मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
आलापल्ली:- स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय रासेयो व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. यु टिपले, प्रमुख वक्ते एच.के.अकदर वकील, प्रा. डी .टी. डोंगरे, सोपान कवळे सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते. अकदर यांनी संविधानाचा वापर फक्त अधिकार मिळविण्यासाठी न करता कर्त्यव्याचे पालन करण्यासाठी कसा करता आला याबाबत सविस्तर माहिती देवून, शारीरिक अस्पृश्यता संपली पण मानसिक अस्पृश्यता संपली नाही याबद्दल खंत व्यक्त केली.
सोपानदेव यांनी राज्यघटनेने आपल्याला विविध अधिकार प्रदान केले आहेत. पण आज गटबाजी मुळे, उदासीनतेमुळे, अज्ञानामुळे देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूशाहीकडे कशी जात आहे. यासंबधी मार्मिक विवेचन करून संविधान वाचा,समजून घ्या,त्यानुसार कृती करा, डॉ. आंबेडकर यांना एक व्यक्ती म्हणून समजून घ्या असे आव्हाहन त्यांनी केले.प्रा.डोंगरे यांनी संविधान दीन साजरा करण्यामागील भूमिका विशद केली. अध्यक्ष यांनी संविधान ही जिवन जगण्याची गुरुकिल्ली आहे पण आज गटबाजीमुळे, उदासीनतेमुळे काही स्वार्थी राजकारणी लोक त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत व त्यामुळे सामान्य माणूस कसा होरपळला जात आहे यासंबधी मार्मिक विवेचन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.कु.प्रतिमा सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा.पी.डी.सोनुले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.उत्तम गावडे, प्रा.दया मेश्राम, प्रा.कू. अरुणा वाघाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.