अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं. 9822724136
सावनेरः- सालाबादा प्रमाणे या वर्षी युवक जागृती मंडळाच्या वतीने संविधान दिवस बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती येथे थाटात साजरा करण्यात आला. पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष रामराव मोवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते उत्तम कापसे , मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बागडे, प्रा. साहेबराव विरखरे, अरुण रुषिया, बाल्या चौरागडे, माजी नगरसेवक राजीव घुगल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानावर मोलाचे मार्गदर्शन केले . प्रास्ताविक युवक जागृती मंडळाचे सचिव विकी शेंडे यांनी केले. संचालन स्तूप बागडे यांनी तर आभार होमेश्वर डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया बागडे, अंजली कनोजिया,सोनु गव्हाने,सोनु गजभिये यांनी परीश्रम घेतले.

