देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
नागपूर:- डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम राज्यघटनेत ३४०कलम लिहुन ओबीसींचा विचार केला व नंतर त्यांनी आपल्या समाजाचा व अनुसुचित जमातीचा उल्लेख केला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी केलेले प्रयत्न व कार्य आपल्यापर्यंत पोहचुच दिले नाही. पण उशीरा का होइना राष्ट्रीय ओबीसी महा संघाच्या पुढाकाराने डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समस्त ओबीसी पर्यंत नेण्याचे काम करु. तसेच याप्रसंगी जयभीम-जयओबीसीचा नारा बुलंद करण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ. बबनराव तायवाडे यांनी केले.
हिंगणा तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने हिंगणा-रायपूर येथील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर परिसरात २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे यांच्याहस्ते झाले . यावेळी अध्यक्षस्थानी दि निलडोह सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.अशोक चौधरी होते. तर वरिष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, ज्येष्ठ विधीतज्ञ अॕड. फिरदौस मिर्झा, प्रबोधनकार सौ. नंदाताई फुकट व माजी सनदी अधिकारी किशोर गजभीये, शाळा संचालक नाना सातपुते, उद्योजक बाळासाहेब वाघमारे, हिंगणा पंचायत समीतीचे उपसभापती उमेश राजपुत, जिल्हापरिषद सदस्य दिनेश बंग, संजय जगताप, सदस्या उज्वला बोढारे, सौ.रश्मी कोटगुले, पंचायत समिती सदस्य लिलाधर पटले, सुनिल बोंदाडे, सुजित भोयर, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष गुणेश्वर आरिकर, शरद वाटकर व शेषराव येलेकर हे प्रमुख अतिथी होते.
याप्रसंगी इनायतुल्ला शेटे, नामदेव भगत, डाॕ. शितल उमरे, डाॕ.देवेंद्र कैकाडे, सौ.वैशाली केळकर, कर्मयोगी फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज ठाकरे, दिलीप ढवळे, रत्नसेन डहाट, अनिल चानपुरकर व सेवानिवृत्त-शिक्षक राजेश भुते या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय-ओबीसी-महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे, विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल, सरपंचा इंद्रायनी काळबांडे, सरपंच प्रेमनाथ भलावी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी सभापती उज्वला बोढारे यांनी तर संचालन विनायक इंगळे गुरुजी, मनोगत नागपूर-जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ चौधरी व आभार लिलाधर दाभे यांनी मानले. याप्रसंगी ओबीसी बांधवांना संविधानाचे वितरण करण्यात आले. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ चौधरी, पत्रकार लिलाधर दाभे, कार्याध्यक्ष रविंद्र देशमुख, उपाध्यक्ष राजु बावनकुळे, महासचिव प्रिती राऊत, जिल्हा सचिव रविंद्र आदमने, हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत, महिला अध्यक्षा सायली थोटे, हिंगणा शहराध्यक्षा निलीमा गोबाडे, संजय काकडे, संगिता नरड, नागपूर शहर दक्षीण-पच्छिमचे अध्यक्ष ललित देशमुख, युवा जिल्हा सचिव आशिष पुंड, जिल्हा संघटक दिलीप राऊत, गजानन काकडे, सौ.आशुताई पटले,विजय सराड,अनिल मारोडकर, आशा बुरनुरे, अनंता शेंडे, संजय राऊत, प्रविण खाडे, शशिकांत थोटे, सुनिल बंड, मनोज ढगे, लोकेश चव्हाण,बंटी हरिणखेडे, हेमंत कुकडे, प्रविण दुरुगवार, संदीप काळमेघ, श्याम फलके व इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

