डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड:- शहरात आणि आजू बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्थावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे रहदारी करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकानी चुकीचे पद्धतीने रहदारीला अडखळण निर्माण होईल अशाप्रकारे रस्त्यावर आपली वाहने पार्क केल्याचे दिसून आल्याने निगडी वाहतूक पोलिसांनी हॉटेल मालकीची चांगलीच कान उघाडणी केली आहे. ही घटना मंगळवारी (ता.२९) रोजी निगडीतील वाहतूक नगरी येथे दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निगडीतील वाहतूक नगरी येथील अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी अवजड वाहने पार्क केलेली असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होवून अपघात होण्याची शक्यता असत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक विजया कारंडे यांनी त्वरित अशा वाहनावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित वाहतूक पोलिसांना दिले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

