सचिन पावरा जळगाव प्रतिनिधी
बलवाडी:- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
या अपघात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी काही प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमे जवळील बलवाडी गावा जवळ एका बसने बोलेरो चार चाकी गाडीला टक्कर मारली. ही टक्कर इतकी भीषण होती की, बसचे सर्व काचा फुटल्या.चाचरिया येथे रॅली मधून येताना संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना बलवाडी सेंधवा रोड ला बस चालकाने ओव्हर टेक करत असताना समोर जात असलेली बोलेरो ला टक्कर दिली. यात बसचे सर्व काच फुटले. या घटने नंतर बसचा वाहक हा घटना स्थळावरून पळून गेला त्यामुळे प्रवासाची संताप व्यक्त केला. त्यानंतर बस मध्ये बसलेल्या प्रवास्याना आदिवासी कार्यकर्त्यांनी दुसऱ्या बसने सुखरूप घरी पोहचवण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

