फयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे:- दिनांक ०१/१२/२०२२ रोजी, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार परिमंडळ – १.२.३ कार्यक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना, सिंहगडरोड मोठाणे, पुणे गु.र.नं. ४८४ / २०२२ एनडीपीएस अॅक्ट ८ (क). २० (ब) (ii) (अ), २१ (ब), २९ या गुन्हयातील इन्स्ट्राग्राम सोशल मेडियाव्दारे अंमली पदार्थ विक्री करणारा पाहिजे आरोपी नामे स्वप्नील विकास बनसोडे, वय २८ वर्षे रा.जी कॉटर, सर्व्हेट कॉटर्स, गोखले इन्स्टीटयूट. बी.एम.सी.सी. रोड, डेक्कन, पुणे हा दादासाहेब कुदळे पथ, स्टाफ क्वॉटर गेट नं. ०२. गोखले इन्स्टीटयूट, डेक्कन, पुणे याठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याचा शिताफीने शोध घेवून त्यास पकडले. असता त्याचे ताब्यात किं.रु.१,२८,१७०/- चा त्यामध्ये ०२ किलो ३३३ ग्रॅम वजनाचा गांजा, ३० ग्रॅम ०७० मिलीग्रॅम वजनाचे ओलसर चरस असा अंमली पदार्थ तसेच गुन्हयाकरीता वापरलेली एक दुचाकी वाहन व दोन इलेक्ट्रीक वजन काटे असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आलेने त्याचे विरुद्ध डेक्कन पो.ठाणे, पुणे गुरनं १६३/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ( क ), २०(ब) (11) (अ) (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन, नमुद आरोपीस अटक करुन पुढील तपासकामी डेक्कन पो.ठाणे, पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह-आयुक्त, श्री. संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शन व सुचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा. पो निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके मारुती पारधी, पांडुरंग पवार प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, नितेश जाधव विशाल दळवी, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली आहे…

