अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नंबर-9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील वाघोडा येथील वैशाली बौद्ध विहार पंच कमिटी येथे भव्य समाज प्रबोधनात्मक भजन गायन सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या समाज प्रबोधनात्मक भजन गायन सम्मेलनात नागपूर जिल्हातील अनेक गावातील भजन मंडळ सहभागी होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे 6 डिसेंबर रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधीसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 स्मृतिदिनानिमित्त भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर भव्य भजन गायन संमेलनाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 7 डिसेंबर ला सायं. 8.30 वाजता नामदेवरावजी गजभिये यांच्या हस्ते होईल व भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
भजनाची दोन गटात विभागणी असून तबला पेटी गटात प्रथम क्र.7000, दुसरा क्र,6000, तिसरा क्र. 5000, चौथा क्र.4000/- देण्यात येईल. टाळ पखवाद गटात अनुक्रमे १)5000, २)4000, ३) 3000, 4) 2500 हजार रुपये या प्रमाणे बक्षीस वितरण करण्यात येईल.
8 डिसेंबरला सायं. अविनाशजी प्रसाद उप क्षेत्रीय प्रबंधक सावनेर एरिया यांच्या अध्यक्षतेत.मुख्य अतिथी माराेती मुळूक, तसेच प्रमुख पाहुणे मा. सेवकरामजी राऊत कार्यकारी संपादक दैनिक निर्भीड, मारुती वासाडे- सहाय्यक अभियंता भानेगाव शिंगोरी उपक्षेत्र, प्रा. संदीपजी भोंगाडे-अध्यक्ष सहकार भारती सावनेर तालुका, अशोकभाऊ निंबाळकर, शिवमंगल पाल, गुणवंता लांजेवार, युवराजजी मेश्राम (पत्रकार), अनिल अडकिने (पत्रकार) मंगेश भाईक, मा. वैभव ढवळे, प्रा. माधुरी बारमासे आणि राकेश भाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त भजन कलावंतांनी या संमेलनात उपस्थित राहून बौद्ध धम्माचा जन जागृती करण्यासाठी प्रसार व प्रचारात सहयोग करून कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहान वैशाली बौद्ध विहार पंचकमेटी वाघोडा यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

