पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- मुंढवा पोलीस स्टेशनचे रेकार्डवरील गुन्हे करणारे गुन्हयातील आरोपी नामे १) योगेश प्रकाश नागपुरे वय ३५ वर्षे (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी) २) प्रमोद अजित साळुंखे, वय २५ वर्षे, रा. लेन नंबर १ खराडी, पुणे ३) वाजीद अश्पाक सय्यद, वय २५ वर्षे, रा. सर्वे नंबर २१/०४. क्रांतीपार्क, शिवानंद हॉटेल जवळ खराडी पुणे ४) मंगेश बाळासाहेब तांबे, वय २८ वर्षे, रा. सर्वे नंबर २०/०४, खराडकर पार्क, नदी पुलाजवळ, खराडी पुणे. ५) लक्ष्मणसिंग उर्फ हनुमंता उत्तरसिंग तंवर, वय ३५ वर्षे, रा. एच. एम. एस. हेवन बिल्डींग, फ्लॅट नंबर ५०२ घुलेनगर, मांजरी, पुणे ६) एक महिला (पाहिजे आरोपी) यांचे पैकी प्रमोद साळुखे याने पत्रकार असल्याचे सांगुन तक्ररारदार यांचे गोडाऊनमध्ये भेसळयुक्त अन्न धान्याची विक्री करून, दोन नंबरचा धंदा करता यापुर्वी गुटख्याची विक्री करुन खुप पैसा कमावला आहे. आत्ता पेपरमध्ये बातमी लावून बदनामी करुन, पुर्णपणे बरबाद करून टाकतो, जर पैसे दिले नाही तर खानदानाचा खुनच करुन टाकतो अशी धमकी देवून फिर्यादी यांचे मुलाला हाताने मारहाण करुन, त्यांचे पत्नीला व मुलाला गोडाऊन मधुन बाहेर पडण्यास अटकाव करून जबरदस्तीने ०५ लाख रुपये खंडणी घेवुन गेले आहेत.
यातील आरोपी नामे १) योगेश प्रकाश नागपुरे वय ३५ वर्षे (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी ) असुन त्यांने त्याचे इतर सदस्यांना वेळोवेळी बदलुन बरोबर घेऊन खडक, मुंढवा, हडपसर, बंडगार्डन पोलीस ताणे कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे केलेबाबत माहिती प्राप्त झाली आहे. दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी योगेश प्रकाश नागपुरे याचेविरूध्द दाखल असलेले खुनाचा प्रयत्न, खंडणी, मानवी तस्करी इ. स्वरुपाचे गुन्हे नोंद असून गुन्हे करतेवेळी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या साथीदारांसह गुन्हे केले आहेत…
सदर आरोपी विरुद्ध मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर २८२ /२०२२. भा. दं.वि. कलम ३८४. ३८७,३४१, ४५२,५०६, ३२३, १२०(ब) १४३ या गुन्हात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३ (१) (३) सह १३५प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी यांचे की आ.क्र.२.३.४ व ५ यांना अटक करण्यात आली असुन, आ.क्र.१, व ६ है सदर गुन्हयात पाहीजे आरोपी आहेत.यातील नमुद आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा धजावत नसलेने तसेच त्यांचे सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) या कलगाचा अंतर्भाव करणेकामी गुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अजित लकडे, यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख यांच्या मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन १) योगेश प्रकाश नागपुरे वय ३५ वर्षे (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी) २) प्रमोद अजित साळुंखे, वय २५ वर्षे, रा. लेन नंबर १ खराडी, पुणे. ३) वाजीद अश्पाक सय्यद, वय २५ वर्षे, रा. सर्वे नंबर २१/०४, क्रांतीपार्क शिवानंद हॉटेल जवळ, खराडी पुणे. ४) मंगेश बाळासाहेब तांबे, २८ वर्षे, रा. सर्वे नंबर २०/०४, खराडकर पार्क, नदी पुलाजवळ, खराडी पुणे. ५) लक्ष्मणसिंग उर्फ हनुमंता छत्तरसिंग तंवर वय ३५ वर्षे रा. एच. एम. एस. हेवन बिल्डींग, फ्लॅट नंबर ५०२, घुलेनगर, मांजरी, पुणे ६) एक महिला (पाहिजे आरोपी) यांचेविरुध्द गुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २८२ / २०२२. भा. दं. वि. कलम ३८४,३८७,३४१, ४५२, ५०६, ३२३, १२०(ब) १४३ या गुन्हात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री नामदेव चव्हाण यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, श्री बजरंग देसाई, हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमीताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. नामदेव चव्हाण, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्री बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री अजित लकडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री प्रदीप काकडे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री समीर करपे, पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे, नाना भांदुर्गे, दिपक कांबळे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ४९ वी व एकुण ११२ वी कारवाई आहे.

