प्रशांत कांबळे पुणे शहर प्रतिनिधी
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे रेकार्डवरील गुन्हे करणारे गुन्हयातील आरोपी नामे १) राज रविंद्र भवार, वय २४ वर्षे (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी ) २) जयेश उमेश भोसले वय १९ वर्ष रा.स.नं.४६ पत्र्याची चाळ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे ३) सुमित सुभाष साळवे वय १९ वर्ष रा. रामवाडी पुणे ४) गौरव सुनिल कदम वय २२ वर्ष रा.स.नं.३६ छत्रपती शाहु सोसायटी फ्लॅट नं. २७ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे (पाहिजे आरोपी) ५) अकबर आयुब शेख वय २१ वर्ष रा. वडारवस्ती विश्रांतवाडी पुणे (पाहिजे आरोपी) व तीन विधी संघर्षित बालके यांचेवर शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
यातील आरोपी नामे १) राज रविंद्र भवार, वय २४ वर्षे हा (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी) असुन त्यांने त्याचे इतर सदस्यांना वेळोवेळी बदलुन बरोबर घेऊन विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन विमानतळ पोलीस स्टेशन परीसरात परीसरात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीसांचे आदेशाचा मंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक करवाई करूनदेखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.
सदर आरोपी विरुध्द विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २७४ / २०२२, भादयिक
३०७,३०८,४४७,४२७,१४१, १४३, १४४, १४८, १४९, शस्त्र अधि. ४ (२५) मपोका अधि.३७ (१) (३) १३५ कि. लॉ. अमे
कलम ३ ब ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी यांचे पैकी आ.क्र.२ व ३ यांना अटक करण्यात आली असुन ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत. आ.क्र.१.४ व ५ हे सदर गुन्हयात पाहीजे आरोपी आहेत. दोन विधीसंघर्षित बालके ताब्यात आहेत.
यातील नमुद आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा धजावत नसलेने तसेच त्यांचे सुधारणा होत नसलेने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय भापकर यांनी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्रीमती आरती बनसोड, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ -४ पुणे शहर श्री शशिकांत बोराटे यांच्या मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव सादर केला होता…
सदर प्रकरणाची छाननी करून १) राज रविंद्र भवार वय २४ वर्षे हा (टोळी प्रमुख पाहिजे आरोपी) २) जयेश उमेश भोसले वय १९ वर्ष रा.स.नं. ४६ पत्र्याची चाळ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे ३) सुमित सुभाष साळवे वय १९ वर्ष रा. रामवाडी पुणे ४) गौरव सुनिल कदम वय २२ वर्ष रा. स.नं. ३६ छत्रपती शाहु सोसायटी फ्लॅट नं. २७ धानोरी रोड विश्रांतवाडी पुणे (पाहिजे आरोपी) ५) अकबर आयुब शेख वय २१ दर्ष रा.बडारवस्ती विश्रांतवाडी पुणे (पाहिजे आरोपी) व तीन विधीसंघर्षित बालके यांचेविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २७४ / २०२२ भादविक ३०७, ३०८, ४४७, ४२७, १४१, १४३, १४४, १४८, १४९, शस्त्र अधि. ४ (२५). मपोका अधि.३७(१) (३) १३५, क्रि. लॉ. अमे. कलम ३ व ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा.अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्रीमती आरती बनसोडे, हया करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल-४ पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त, खड़की विभाग पुणे श्रीमती. आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. श्री. दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजयकुमार शिंदे, महिला पोलीस उप निरीक्षक शुभांगी मगदुम सर्वेन्स पथकातील पोलीस अमलदार मनोज शिंदे, सुनिल हसबे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ४८ वी व एकुण १११ वी कारवाई आहे.

