पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड
पुणे: दि. ०१/१२/२०२२ रोजी पहाटे ०२/२० वाचे सुमारस पोलीस नियंत्रण कक्ष यांनी हिंजवडी पोलीस ठाणे येथे म्हाळुगे ता मुळशी जिल्हा पुणे येथे असलेल्या आयसीआसीजाय बँकेचे एटीएम मध्ये चोरीचा प्रयत्न झालेबाबत कॉल प्राप्त झाल्याने कॉलचे गांभीर्य लक्षात घेवुन रात्रगस्तीवर असलेले पोलीस उप निरीक्षक रविंद्र मुदळ, सहा. पोलीस निरीक्षक, सहा. पो. उपनिरी. भालेराव, पोलीस नाईक / १७६३ आगलावे, पोलीस नाईक १७३० महात असे तात्काळ घटनास्थळी पोहचले असता ए.टि.एम. सेंटरजवळ एक इसम आधारात लपवुन बसलेला दिलेला असता तो पोलीसांची चाहुल लागताच पळुन जावून लागला असता त्यास स्टाफच्या सहाय्याने ताब्यात घेवुन त्याचा नाव व पत्ता आदित्य भिमराव कांबळे वय २० वर्षे रा पिंपळे गुरव पुणे असा असल्याचे सांगितला असता त्याचेकडे कसून चौकशी करता तो व त्याचे साथीदार नामे १) विशाल बंडु कारके वय २२ वर्षे रा. चिखली पुणे व २) प्रथमेश प्रकाश जाधव वय २० वर्षे रा. पिपळे गुरव पुणे यांचेसह प्रथमेश याचे अॅक्सेस मोटार सायकलवरून येवुन ए.टि.एम. फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे व त्याचे दोन साथीदार हे येथून पळुन गेल्याचे सांगितले.
फिर्यादी यांचे तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाणे येथे ए.टि.एम. फोडण्याचा प्रयत्नचा गंभीर गुन्हा दाखल असताना यातील पळवून गेलेले आरोपींना तपास पथकातचे सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे, सहा. पो. उपनिरी मारणे, पो.हवा. केंगले, कुदळ, धुमाळ, शिंदे यांनी सातारा येथे पळुन जण्याचे तयारीत असताना पिंपळे गुरव पुणे परिसरातून ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पो. उप निरीक्षक बी. बी. मारणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री अंकुश शिंदे सी, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, गा.डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि २, पिंपरी चिंचवड, मा. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे). सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रमुख सपोनि सागर काटे, राम गोमारे, रविंद्र मुदळ, पोउनि रमेश पवार, पोलीस अंमलदार, बी. बी. मारण बाळकृष्ण शिंदे, नागेश भालेराव, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, सचिन आगलावे, तौसीफ महात अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अगर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांनी केली आहे.

