हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शहरातील दादाभाई नौरोजी वॉर्डातील सुभाषचंद्र बोस शाळेलगत राहणाऱ्या दिपक उर्फ गोलू बाबुराव कोठारे वय 30 वर्षे यांनी आपले राहते घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना दुपारी 1:000 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
घरी कुणीच नसल्याची संधी पाहून घरी असलेले वासमोल नावाचे द्रव पदार्थ प्राशन केले या घटनेची माहीती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी समयसूचकता दाखवत संबंधित तरुणाला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले. मात्र सदर युवकाच्या शरीरभर विष पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर तरुण हा अविवाहित असून मागील काही वर्षांपूर्वी कंत्राटी स्वरूपात विज दिवे दुरुस्तीचे कार्य करीत होता. या घटनेची माहीती बल्लारपूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी आली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.