✒️प्रविण जगताप, हिंगणघाट तालुका प्रतिनिधी ✒️
हिंगणघाट:- आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगणघाट शहरातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते तथा माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, शहराध्यक्ष आशिष पर्बत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
हिंगणघाट शहरातील भिमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ लोटन चौक लोहकरे यांच्या घरापासून ते बोहरा कब्रस्तान पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत रूपये २१ लक्ष ९३ हजार, विर भगत सिंह वार्ड प्रभाग क्रमांक ९ डांगरी पुल ते लताताई थुल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे किंमत रूपये २६ लक्ष ६१ हजार , महात्मा फुले वार्ड प्रभाग क्रमांक ८ येथे के.जि.एन.हाॅल ते अशोक रामटेक यांच्या घरापर्यंत नाला बांधकाम करणे किंमत १४ लक्ष ५३ हजार रुपये, महात्मा फुले वार्ड प्रभाग क्रमांक ८ येथे शेखर राणे यांच्या घराजवळ पुलाचे बांधकाम करणे ९३लक्ष ७४ हजार रुपये, कोचर वार्ड बोधिले ते स्वीपर काॅलनी नाला बांधकाम किंमत ४६लक्ष ८०हजार यशवंत नगर प्रभाग क्रमांक १५ येथे बुद्ध विहार ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण पथवे व वृक्षारोपण करणे किंमत २८लक्ष ५३ हजार, भुमिपुजन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते संपन्न यशवंत नगर प्रभाग क्रमांक १५ येथे वाचनालय बांधकाम करणे किंमत ३२ लक्ष १७ हजार, संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक १६ बुद्ध विहार ओपन स्पेसला संरक्षक भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण करणे किंमत १८ लक्ष ३५हजार रूपये, संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ६ संबोधी नगर बुद्ध विहार ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण, संरक्षक भिंतीचे बांधकाम पाथवे व वृक्षारोपण करणे किंमत ३७लक्ष ६५ हजार, संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ६ पांडूरंग वैद्य ते मोतीराम मुन ते कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे २४ लक्ष २२हजार ,संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ६ गायकवाड ते टेंभंरे ते गुडधे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम किंमत २५लक्ष ७० हजार रुपये, संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ५ भास्कर मानकर यांच्या घराजवळ बुद्ध विहार ओपन स्पेसचे संरक्षक भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण, पथवे, वृक्षारोपण करणे किंमत ३३ लक्ष रुपये , संत तुकडोजी वार्ड प्रभाग क्रमांक ५ रमाई नगर बुद्ध विहार ओपन स्पेसचे संरक्षक भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण पथवे वृक्षारोपण करणे ३२लक्ष ७८ हजार, संत कबीर वार्ड १९ येथे मानेकर यांच्या घरासमोरील समाजभवनाला संरक्षक भिंतीचे बांधकाम व सौंदर्यीकरण पथवे वृक्षारोपण करणे ८० लक्ष ६ हजार रुपये व संत कबीर वार्ड येथे देवतळे ते भुते यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे १६ लक्ष ९८ हजार रुपये असे एकूण ५ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.
यावेळी सुभाष कुंटेवार सोनू गवळी, अमोल खंदार, प्यारूभाई, सुनील डोंगरे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल, रविला आखाडे, शिवाजीराव आखाडे, छाया सातपुते, शितल खंदार, रश्मी पर्बत, वदंना कामडी, भाजयुमो शहराध्यक्ष सोनू पांडे, सौरभ पांडे, कवी इंगोले, तुषार येणोरकर, तुषार हवाईकर नगर परिषद अभियंता मावळे, नासरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते प्रभागातील मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.