महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन संगमनेर:- अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे छापा टाकून सुमारे २ लाख रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस आणि ३ वाहने असा सुमारे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संगमनेर शहरातून काही वाहनांमधून गोमांसाची वाहतुक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, संदिप चव्हाण, बबन बेरड यांच्यासह संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील तपास पथकातील पो. ना. आण्णासाहेब दातीर, पो. कॉ. सुभाष शिवाजी बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव यांच्या संयुक्त पथकाने जोर्वे नाक्यावर सोमवारी मध्य रात्री एक वाजेच्या सुमारास सापळा लावला होता.
जोर्वे रोडवरील रेहमत नगर, गल्ली नं.४,येथून सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एक झायलो गाडी येताना पोलिसांना दिसली. त्या पाठीमागे छोटा हत्ती येताना दिसला. सदर झायलो गाडी पोलिसांनी थांबविली. मात्र छोटा हत्ती चालकाला पोलिसांची चाहूल लागल्याने तो गाडी सोडून पळून गेला. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती आणि त्या मधील १ लाख २० हजाराचे ६०० किलो गोमांस तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीची झायलो कार व त्या कारमधील ८० हजार रुपयांचे ४०० किलो गोमांस असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हा शाखेचे पो. ना. सचिन आडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात सलमान नजीर शेख आणि मुद्दसर करीम कुरेशी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारणा अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे दाखल गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सलमान शेख यास अटक केली आहे. तर फरार झालेला मुद्दसर कुरेशीयाचा पोलीस शोध घेत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

