देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिंगणा तालुक्यात विवीध ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
वानाडोंगरी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनीही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी गृहपाल रविशेखर राठोड, लिपिक राहुल टेंभरे, यांचें मार्गदर्शनाखाली वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांनी वस्तीगृहापासुन बौद्ध हक्क परिषद हिंगणा पर्यंत ‘मेनबत्ती अभिवादन फेरी’ काढत तेथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी वस्तीगृहातील रजत ठेलकर, रविकांत सूर्यवंशी, स्वप्नील खंडारे, प्रज्ञाशील फुलझेल, हर्षल रंगारी, मुन्ना नागदेवते ,संकेत भुजाडे, आकाश कोचे, साहिल खोब्रागडे, साहिल बुगगेवार, हिमांशू टेम्बावूर्न, सुजल मेश्राम, वैभव वाघमारे, विशाल तांडेकर, बालाजी गायकवाड, संतोष गवळी, प्रफुल वाळोकर, देवाशिष हनवते, विक्रांत सिरसाट इत्यादींनी महामानवास आदरांजली वाहिली.

