सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सर्व घरा घरात असावी, या दृष्टिकोनातून समाजातील विविध कार्यक्रमात हजारो बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्याचा संकल्प करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नव्याने बांधलेल्या गृह प्रवेश कार्यक्रमात वंचित अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. ऋषिकेश माने व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्या प्रसंगी, सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे संस्थापक उमरफारूक ककमरी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.