प्रवीण जगताप हिंगणघाट प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री संत शिरोमणी एरंडेल तेली बहुउद्देशीय सामाजिक संस्था हिंगणघाट द्वारा आयोजित दत्त मंदिर वॉर्ड परिसरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकररावजी तराळे तर प्रमुख अतिथी म्हणून एरंडेल तेली समाज विदर्भ महिला उपाध्यक्ष हेमाताई दुरबूडे, रामभाऊ खानखुरे, सुरेशरावजी कावळे, रतनजी दुरबुडे आदी उपस्थित होते. दत्त मंदिर पासून कार्यक्रम स्थळा पर्यन्त बँड वाजेच्या गजराज रॅली काढण्यात आली.
सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हेमाताई दुरबुडे, शंकरावजी तराळे, रामभाऊ कावळे आदींनी महाराजांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना शंकरावजी तराळे यांनी सांगितले की कोणताही संत हा एका समाजापूरता मर्यादित राहू शकत नाही. त्या संताची शिकवण व विचार हे सर्वच समाजाला उपयोगी पडत असते. या कार्यक्रमाचे संचालन सतीश कावळे तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन अजय मुळे यांनी केले.
या कार्यक्रमाला संदीप भजपुजे,किशोर मुळे, सचिन कामडी, प्रदीप लाकडे, जितेंद्र तराळे, नरेश तराळे, पंकज चौधरी, सुनील भजभुजे, किशोर भजपुजे, अमोल निकुरे, महेश सातपुते, राजू कावळे, पुरुषोत्तम गंडाईत, बाबाराव सहारे, पप्पू भजभुजे, राजूभाऊ शेंडे, किशोर ठाकरे, शंकर भजभुजे, ओमकार कावळे, सुनील कामडी, रवींद्र कोलते, किशोर तराळे, निलेश भजभुजे, कृष्णाजी कावळे, शंकर सहारे, नरेंद्र कामडी,दिगंबर कामडी, मोंटू भजभुजे, प्रवीण भजभुजे, दामूभाऊ सातपैसे, विलास कैकाडे, चंद्रशेखर तराळे, निखिल ठाकरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

