वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे,दि.10:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास या योजनेअंतर्गत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध वस्तीतील लोकांसाठी पुस्तके खरेदी करण्यात येत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध दुर्बल घटकातील नागरिकांनसाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. पण दुर्दैव आहे की त्या योजनेचा लाभ आज या नागरिकांन पर्यंत पोहचत नाही. योजना फक्त कागदावर असतात. त्यामुळे या जातीतील लोकांचे जीवनमान सुधारत नाही. त्यात ही या योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले तर या योजनेचा बोजवारा उडाला म्हणजेच समजा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास या योजनेअंतर्गत पुस्तके खरेदीत योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत त्यांची चौकशी व दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला ई-मेल करण्यात आला आहे. या योजनेत सुधारणा करून २०१८ पासून प्रत्येक जिल्ह्यास एक कोटी याप्रमाणे ३६ कोटी रुपयांची पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. सरकारकडून खरेदी करण्यात येणाऱ्या या २१० पुस्तकांच्या यादीतील अनेक पुस्तकांचा अनुसूचित जाती नवबौद्ध वस्तीतील लोकांना सध्या उपयोग होत नाही. त्याचबरोबर या पुस्तकांची किंमत ही अवाजवी आहे, असे माने यांनी पत्रात नमूद केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

