मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिन्नर:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात कारचे टायर फुटून झालेल्या या भीषण अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवारी दि. 9 दुपारी साडेचारच्या सुमारास घडली नाशिकच्या सिडको, पाथर्डी फाटा परिसरतील हे विद्यार्थी होते. त्याची नावे खालील प्रमाणे आहे. हर्ष ऊर्फ आदित्य दीपक बोडके वय 17 वर्ष, रा. कामटवाडे, सिडको, नाशिक, सायली अशोक पाटील वय 17 वर्ष, रा. राणेनगर, सिडको, नाशिक, प्रतीक्षा दगू घुले वय 17 वर्ष, पाथर्डी फाटा, नाशिक, मयुरी अनिल पाटील वय 16 वर्ष, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक, शुभम तायडे वय 17 वर्ष, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता.
अपघातात साक्षी नितीन घायाळ 18, पाथर्डी फाटा, नाशिक व साहिल गुणवंत वारके 18, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा, नाशिक या दोन विद्यार्थ्यांसह अन्य वाहनांतील गायत्री अनिल फरताळे रा. उंटवाडी, नाशिकव सुनील ज्ञानेश्वर दळवी रा. पुणे जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.
सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरघाव वेगाने येत असलेल्या कारचा एमएच 03 एआर 1615 टायर फुटला आणि ती विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दोन कारवर जाऊन आदळून उलटली. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला. रवींद दगा माळी 45, रा. वारकुंडाने, ता. जि. धुळे यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट चालक हर्ष बोडके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

