पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
फरासखाना पोलीस ठाणे पुणे शहर
पुणे :- फरासखाना पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नामे भूषण उर्फ संकेत आनंद तारु, वय-२२ वर्षे रा. १११७ भोईराज भवन जवळ, कसबा पेठ, पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, पिस्टल, पालघन या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा, बेकायदा अग्निशस्त्र व शस्त्र बाळगण यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. मागील ०५ वर्षामध्ये त्याचे विरूध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाघा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालग़तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते,
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करून श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमुद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे व श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दहशत निर्माण करणान्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आजतागायत ८९ गुन्हेगारांना एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द केले आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

