पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- दि. ०६ / १२ / २०२२ रोजी हिल बहु सोसायटीचे समोरील चहाचे टपरीजवळ महात्मा सोसायटी रोड येथे दोन इसम मेफेड्रॉन ( एम. डी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत अशी बातमी अधिनाथ चौधर संजय दहिभाते यांना मिळाली. त्याप्रमाणे वरिष्ठांना बातमीची माहिती देवून छापा कारवाईबाबत परवागनी घेवून पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब बडे यांचेसह पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अगलदार अधिनाथ चौधर योगेश सुळ, संजय दहिभाते, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके, दादा भवर असे बातमीचे ठिकाणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांचे सुचनांप्रमाणे दबा धरून बसले असताना बातमीप्रमाणे वर्णनाचे दोन संशयित इसम बुलेट मोटारसायकल वरून येवुन चहाचे टपरीजवळ थांबले,
सदरवेळी बातमीप्रमाणे वर्णनाचे इसम असल्याची खात्री झाली असता पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब बडे यांनी इशारा दिला असता स्टाफने विभागुन येवून इसम नामे रवि मोहनसिंग राठोड उर्फ बिल्ला, वय – ३६ वर्षे, रा. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे. मुळ रा. कोटा, राज्य राजस्थान २) आदित्य संदीप माण, वय- २३ वर्षे रा. बावधन, पुणे. मुळ रा. सिडको, नाशिक यांना मोटारसायकल सह ताब्यात घेवून एन. डी. पी. एस अॅक्ट प्रमाणे झडती घेतली असता आरोपींकडून एकूण ०६ ग्रॅम १५० मिली ग्रॅम वजनाचे एम.डी. किंमत १,०१,२५०/- रु.चे २) ०३ मोबाईल २७,०००/- रु. कि. ३) ७०,०००/- रु. कि. एक बुलेट मोटारसायकल असा एकूण १,९८,२५०/- रु. कि. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुध्द गुन्हा रजि नं २८९ / २०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी, मा.पोलीस उपआयुक्त श्री सुहेल शर्मा यांचे अधिपत्याखाली मा. सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शन सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे तपास पथक प्रभारी अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी व तपास पथकातील अंमलदार अधिनाथ चौधर, योगेश सुळ, संजय दहिभाते, विष्णु राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, गंगेश शेळके, दादा भवर यांनी कामगिरी उत्कृष्ट कामगिरी केली.