✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या वंजारी समाज बांधवांचा सत्कार सोहळा, आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जितेंद्र केदार सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वासुदेवराव घुगे वर्धा, तसेच दिगंबरराव खांडरे, हिंगणघाट लक्ष्मणरावजी भारस्कर अल्लीपूर, श्री. मुंडे पीएसआय हिंगणघाट, श्री. टापरे पीएसआय हिंगणघाट, मुसळे मॅडम पीएसआय हिंगणघाट, प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विशेष प्राविण्य प्राप्त वंजारी समाज बांधवांचा शाल श्रीफळ गोपीनाथ मुंडे साहेबांची प्रतिमा व वृक्षाचे रोपट देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नव्हाते वणी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अशोकजी साठे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धात्रक यांनी केले. आभार प्रदर्शन सारिका ताई करपे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताद्वारे रंजनाताई खांडरे व श्रुतिकाताई खांडरे राहणार धाडी तालुका आर्वी यांनी केले.
सदर कार्यक्रमाला हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी मोठी तालुक्यामधून तसेच वणी, अल्लीपूर कोसुर्ला, छोटी आर्वी, सोनेगाव, वेणी वर्धा, आर्वी मोठी, येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी व समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमांमध्ये वंजारी समाजाचे कार्य जिल्हास्तरावर करण्याच्या उद्देशाने जिल्हा कार्यकारणीच्या महत्त्वाच्या पदाची घोषणा करण्यात आली.
यावेळी वंजारी समाजसेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष म्हणून वसंतराव हमंद हिंगणघाट, यांची यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव भारस्कर अल्लीपूर, सचिव म्हणून सूर्यकांत आखाडे हिंगणघाट, कोषाध्यक्ष म्हणून कवडूजी साळवे हिंगणघाट, तसेच वर्धा जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणुन अरुणाताई हेमके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.. सर्वांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले..

