✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संस्थांच्यावतीने येथील नागपुर यवतमाळ रोडवरील बुद्ध टेकडीवर स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॅा.अभ्यूदय मेघे, तहसिलदार रमेश कोळपे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी व उपस्थितांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या अभियानात जिल्हाधिकारी, तहसिलदार व गटविकास अधिकारी कार्यालय, आपले सरकार टिम, आधारवड संस्था, रोटरी क्लब गांधी सिटी वर्धा, नेहरू युवा केंद्र, इंडियन रेडक्रॅास सोसायटी, वर्धा सोशल फोरम, जयहिंद फाऊंडेशन, अखिल भारतीय सेवानिवृत्त बीएसएफ कल्याण संस्था, जनहित मंच, युथ फॅार चेंज आदी शासकीय, अशासकीय संस्था, संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कचरा वेचणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांशी संवाद साधला. या महिलांना आधारकार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड व मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध होत असल्या बाबत त्यांनी खात्री केली. कचरा अस्ताव्यस्त टाकल्याने विविध आजार पसरतात तसेच गाव, शहरांचे विद्रुपिकरण होते. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विविध खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसाईकांनी कचरा उघड्यावर न टाकता नियोजित ठिकाणीच टाकावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

