निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा उपकेंद्र नांदगाव अंतर्गत कवठाळा येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्य भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन व अध्यक्षस्थान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्घकिय आधिकरी डॉ. तडवी मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक श्री एन एन निंबाळकर यांनी केले. यावेळी शेकडो नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.

या आरोग्य मिळाव्यामध्ये उपस्थित लाभार्थीचे बीपी, शुगर, रक्ताच्या तपासण्या, क्षयरोग तपासणी, कृष्टरोग तपासणी, असंसर्गजन्या आजाराची तपासणी, गरोधर माता तपासणी, कान नाक घसा तपासणी, सिकल्सेल तपासणी करून आरोग्य स्वच्छता व पोषण आहारा बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आरोग्य वर्धीनी नांदगावच्या समुदाईक आरोग्य अधिकारी श्वेता देवगडे, लॅब टेक्निशियन रमेश भडके, आरोग्य सेवक एस एस शेळके, आरोग्य सेविका ए आय पडवेकर, अंगणवाडी सेविका प्रतिभा निब्राट, आशा स्वयंसेविका पंचेफुला पेरकावर, सविता कपडे, सीमा चौधरी, मदतनीस व सर्व लाभार्थी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

