सचिन पावरा, जळगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चोपडा:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर अंतर्गत आज आरोग्य वर्धिनी मेळावा, मानव विकास शिबिर, एन सी डी तपासणी शिबिर, सिकल सेल, रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी या शिबिरात शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर आणि सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी वैजापूर परिसरातील अनेक नागरिकाची तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉ. प्राजक्ता भामरे मॅडम स्त्रीरोग तज्ञा, डॉ. वाल्मिक पाटील बालरोग तज्ञ, यांनी केली. तपासणी करून रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर अंतर्गत सर्व अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गतपरवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रुग्णवाहिका चालक यांनी सहकार्य केले. शिबिरा साठी उपस्थित सर्वांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र पवार, डॉ सुनील बारेला यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

