पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- चंदननगर पो.स्टे गुन्हा रजि.नं.४५१ / २०२२, भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता. त्या अनुषंगाने चंदननगर तपास पथकातील पोलीस अंमलदार, नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी यांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू करून आरोपी नामे उपकार सिंग नांदसिंग, वय-३० वर्षे, रा.७९ / २, कुलीवाडा, आझाद हिदं चौक, औंध, पुणे, मुळ पत्ता- रामसर रोड, गली लच्छीवाली, घर नं.१६, अमृतसर, पंजाब यास दि. १४/१२/२०२२ रोजी आँच येथुन स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करून त्याचेकडुन २२ ग्रॅम वजानाचे अंदाजे १,०४,०००/- रू ( एक लाख चार हजार रू) किंचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.
सदरची कामगिरी ही मा.राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो. स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे), पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.

