मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक येथून एक खळबळजनक दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये एका प्रेमी युगलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी वय 40 वर्ष, राहणार गांधी नगर आणि रूपाली महेश जाधव वय 35 वर्ष राहणार जाधव संकुल सातपूर यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोरच असलेल्या प्रितम लॉज येथे रुम बुक केली होती.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास ते मुक्कामी आले होते. धार्मिक विधी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तानाजी चौधरी याने आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओळख म्हणून सादर केले. तशी लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंद केली. मात्र रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान महिलेला उलटया होत आहेत म्हणून ती बाहेर आली होती. त्यानंतर तेथे काम करणा-या रूम बॉयला संशय आल्याने त्याने खोलीमध्ये डोकावून पाहिले असता तेथे शेतीसाठी उपरात येणारे येणारे किटनाशक तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या, मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले मात्र त्यांची अवस्था पाहून तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवले.
उपचारादरम्यान सकाळी 6.30 वाजता तानाजी चौधरी याची प्राणज्योत मावळली तर रूपाली जाधव हिची दुपारी 4.30 वाजता तिचाही मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.