संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या गीत, संगीत, नृत्य वेशभूषा, कराटे, भुमिका अभिनय अशा विविध कलाविष्काराचे सादरी करण केले. यात शिवराज ढेंगरे, अश्विन झुंगरे, ऋग्वेद वांढरे यांनी स्वतः वाद्य वाजवून कलागुण सादर केले, मनस्वी शेंडे ने कराटे तर मनन शेंडे ने भूमिका अभिनय सादर केले. यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता तिसरीच्या वर्ग शिक्षिका मंजु नगराळे यांनी कार्यक्रमाचा पदभार सांभाळला. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ज्योत्स्ना टेकाम यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

