निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा, दि.17 डिसेंबर:- कोरपणा तालुक्यात आयुष्यामान भारत, आजादि का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत तालुका कोरपना, प्राथमिक आरोग्य केंद्र कवठाळा (विरुर गाडेगाव) अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भोयगाव येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्याचा गावातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. त्यामधे ग्रामपंचायत उपसरपंच घटे मॅडम, पोलीस पाटील साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे सर, सीएचओ कोरडे, सीएचओ गावडे, एएनएम गेडाम सिस्टर, श्री माथनकर, एमपीडब्लु, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आशा सर्व उपस्थित होते.
- आहार, आरोग्य, स्वच्छता या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
- किशोरवयिन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
- गरोदर माता स्तनदा माता यांना मार्गदर्शन करण्यात आले.
- जलजन्य कीटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले
- असंसर्गजन्य आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
- सिकलसेल आणि गोवर rubella बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच यामध्ये एकुण 127 लाभार्थ्यांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. एनसीडी कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांची बिपी शुगर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच लोकांना कॅन्सर बद्दल माहिती देण्यात आली. तसेच यावेळी विविध तपासणी आणि औषध उपचार करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

