सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
ब्रम्हपुरी/चंद्रपूर:- जिल्हातील ब्रम्हपुरी तहसील कार्यालयाच्या इमारतीचा बांधकामासाठी खोदकाम करीत असताना प्राचीन स्तंभ आठळून आल्याने ब्रम्हपुरी शहरात असलेला पुरातन इतिहास समोर आला आहे. हा स्तंभ बौद्ध कालीन असून तो बौद्ध धम्माशी निगडित असल्याचं काही इतिहासकार सांगत आहे.
चंद्रपूर जिल्हात याअगोदर पण अनेक स्थिकाणी बौद्ध धम्माचे अवशेष मिळाले आहे. भद्रावती येथे असलेले विजासन बौद्ध लेणी तर आधीच जग विख्यात आहे. त्यात या स्तंभामुळे चंद्रपूरच्या इतिहासात अधिक भर पडली आहे. हा स्तंभ ब्रह्मपुरी तहसील कार्यालय परिसरात आढळला.

चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यात अनेक गावात प्राचीन अवशेष विखुरलेले आहेत. चंद्रपूरच्या प्राचीन इतिहास पुन्हा एकदा उत्खनातून पुढे आला. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात इंग्रजकालीन तहसील कार्यालयाची इमारत आहे. तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटीशकालीन आहे. या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकामाचे काम सुरू असताना इथ दगडी स्तंभ आढळला. स्तंभावर नक्षीकाम कोरलेला आहे. त्याखाली दोन हत्ती देवीचे अभिषेक करीत असतानाचे शिल्प कोरले आहे. काही इतिहासकारांच्या मते स्तंभावर कोरलेले शिल्प तथागत गौतम बुद्ध यांची आई महामाया यांचं आहे.
ब्रह्मपुरी शहराला प्राचीन इतिहास..
ब्रह्मपुरी शहराला प्राचीन इतिहास लाभला आहे. याअगोदर सातवाहन राजा विजय याचा सोन्याची नाणी तालुक्यात सापडली होती. शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या उदापूर इथ प्राचीन काळातील इमारतीचे अवशेष आढळतात. तर पंधरा किलोमिटर अंतरावर असलेल्या देवटेक येथे सम्राट अशोक कालीन शिलालेख सापडलेला होता. त्यामुळे ब्रह्मपुरी हे प्राचीन काळी एक महत्वपूर्ण इतिहास कालीन शहर असल्याचे यावरून समोर येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

