पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
युनिट ४. गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे :- दि. १५/१२ /२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट ०४ कडील सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहायक पोलीस फौजदार महेंद्र पवार, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, सारस साळवी, नागेशसिंग कुँवर, रमेश राठोड, विठ्ठल वाव्हळ असे मा. पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे आदेशान्वये चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार हरिष मोरे, सारस साळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सुमारे ०३ महीन्यापुर्वी गणराज चौक बाणेर येथून रात्रीच्या वेळी स्प्लेंडर मोटार सायकलचे हँडेल लॉक तोडून चोरी करणारे दोन इसम शाश्वत हॉस्पिटल, डी पी रोड आंच या ठिकाणी थांबले आहेत.
युनिट-४ कडील पथकास मिळालेल्या बातमीचे ठिकाणी तात्काळ जावून कारवाई करणेबाबत मा. पो. नि. गणेश माने यांनी आदेशित केले. पथकाने बातमीचे ठिकाणी जावून सापळा रचून संशईतांना त्यांचे ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे १) शिवम ऊर्फ बिहारी राकेश चौधरी, वय २१ वर्षे, रा. डी. पी. रोड, आंबेडकर वस्ती, चष्म्याच्या दुकानाजवळ, औंध, पुणे २) विधीसंघर्षित बालक असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे ताब्यातील मोटर सायकल ही त्यांचा साथीदार नामे ३) मोहन अडागळे रा. विधाते वस्ती, औंध पुणे असे तिघांनी मिळून रात्रीच्या वेळी चोरी केल्याचे कबुल केले. तसेच ताब्यात घेतलेल्या शिवम चौधरी यांस विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने त्याचे वरील दोन साथीदारांसह आंध्र, डी पी रोडवरील काका हलवाई दुकानाचे पाठीमागील सोसायटीमधुन केटीएम आर सी ३९०, जुनी सांगवी शितोळे नगर येथुन केटीएम २०० व बाणेर सुस रोडवरील बिटवाईज कंपनीचे मागील गेटजवळून यामाहा फेजर कंपनीची मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच वरील चोरलेल्या मोटार सायकली पंचांसमक्ष काढुन दिल्याने सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या जप्त केलेल्या मोटारसायकलींची एकुण किंमत रु. ७,००,०००/- इतकी आहे. सदर चोरी केलेल्या मोटार सायकलबाबत खात्री केली असता अनुक्रमे १) चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. ४२७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे (२) चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गु.र.नं. ५३२/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे (३) सांगवी पोलीस ठाणे गु. र. नं. ५५० / २०२२ भा. द. वि. कलम ३७९. ३४ प्रमाणे (४) हिंजवडी पोलीस ठाणे गु. र. नं. १०४१/२०२२ भा. द. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी चतुःश्रृंगी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील व युनिट-४ कडील पोलीस अंमलदार महेंद्र पवार, अजय गायकवाड, हरिष मोरे, सारससाळवी, नागेशसिंग कुँवर, रमेश राठोड, विठ्ठल वाव्हळ यांनी केली आहे.