Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक, 176 ग्रामपंचायत साठी 80.79 टक्के मतदान. उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 19, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक, 176 ग्रामपंचायत साठी 80.79 टक्के मतदान. उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पुणे:-
लोकशाहीचे ग्रामीण भागातील पर्व ग्रापंचायत निवडणुकीसाठी काल मतदान झाले. त्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने अनेक उमेदवाराचे जीव तळात मळात दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता 176 ग्रामपंचायत साठी काल रविवार रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. जिल्ह्यातील काही तालुक्यामधील ग्रामपंचायतीमध्ये तुरळक वादविवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 213 मतदारांपैकी 2 लाख 45 हजार 166 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अतिशय चुरशीने झालेले या निवडणुकांमध्ये एकूण 80.79 टक्के मतदान झाले. यावर्षी मतदानाचा टक्का वाढला असल्याने अनेक उमेदवार काळजीत आहे.

पुणे जिल्ह्यातील डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणाऱ्या 221 ग्रामपंचायतची निवडणूक होती. या निवडणूकीमध्ये 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. तर 5 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकही अर्ज न आल्याने त्या गावचे सरपंच पद रिक्तच राहणार आहे. 167 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी व एकूण 176 ग्रामपंचायतीसाठी 651 मतदान केंद्रावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 1853 सदस्य पदाच्या जागांपैकी 712 जागा बिनविरोध झाल्या तर 79 सदस्य पदासाठी एकही अर्ज आला नाही. यामुळे उर्वरित 1062 जागांसाठी मतदान झाले.

ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारच्या निमित्ताने गेली आठ दिवस ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडाला होता. दिवस रात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे ऐन गुलाबी थंडीत राजकारण तापले होते. ते आता निकाला पर्यंत शांत झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकी साठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे मतदानरुपी भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे. निकालासाठी उमेदवारांना एक दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मतमोजणी मंगळवार (ता.20) रोजी होणार असल्याने उमेदवारांची तसेच मतदारांची उत्सुकता एक दिवस कायम जाणार आहे. मतमोजणी प्रत्येक तालुकास्तरावर केली जाणार आहे.

तालुका, मतदान झालेल्या ग्रामपंचायती, एकूण मतदार, झालेले मतदान – टक्केवारी

01) वेल्हे – 25 – 15148 – 12745 – 84.90
02) भोर – 30 – 22910- 19942 – 85.08
03) दौड – 8 – 15446 – 12966 – 83.94
04) बारामती -13 – 37023- 31442 – 84.93
05) इंदापूर – 26 – 57760 – 48351 – 83.71
06) जुन्नर – 13 – 19456 – 16657 – 83.52
07) आंबेगांव -16- 41536 – 31523 – 75.89
08) खेड – 21 – 25601 -18381 – 72.11
09) शिरुर – 4 – 13523 -11368 – 84.06
10) मावळ – 8 – 14577 – 11605 – 79.61
11) मुळशी – 5 – 2306 – 1979 – 85.82
12) हवेली – 7 – 37923 – 28657 – 75.56
एकूण – 176 – 303213 – 245166 – 80.79

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अकोला: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून 14 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

Next Post

दहशत माजविण्यासाठी पिस्टल जवळ बाळगणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…

दहशत माजविण्यासाठी पिस्टल जवळ बाळगणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In