महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी दि. १८ मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पणे पार पडली. सरासरी ८० टक्के मतदान झाले ९८ हजार ३ मतदारांपैकी अंदाजित ७८ हजार ९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाआहे . यात ३७ हजार १५३ महिला मतदारांनी तर ४१ हजार ७६५ पुरुष मतदारांनी मतदान केले. रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
घुलेवाडी, साकूर, तळेगाव दिघे, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबूत बुद्रुक, कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, अंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बुद्रुक, निमोण, वडझरी खुर्द, हंगेवाडी, कनकापूर, करूले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी या ३७ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. यापैकी सायखिंडी आणि डोळासणे या दोन ग्रामपंचायतींचे सरपंच, तसेच निंबाळे आणि कोळवाडे ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.

