आरोग्य मेळावाचे अध्यक्ष म्हणून डॉ, राजेंद्र मानकर उपस्थित होत.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या उप पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 19 डिसेंबर रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली “भव्य आरोग्य” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या भव्य मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून कु.डॉ. अस्मिता देवगडे उप जिल्हा रुग्णालय अहेरी तसेच उदघाटक म्हणून डॉ. राजेश मानकर (वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र राजाराम) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मडावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजाराम, याकूब खान (PI, सीआरपीएफ) यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी उप पोलीस स्टेशन राजाराम खा, विजय कोल्हे यांनी केले. डाॅ. मानकर यांनी उपस्थितांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष कू. डॉ. देवगडे यांनी “पोलीस प्रशासन आदिवासी भागात करत असलेल्या कामांबाबत महत्त्व पटवू देऊन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
सदर जनजागरण मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकी व आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ देण्यात आला आहे.
यावेळी ब्लडप्रेशर चेकअप 13, शुगर चेकअप 13,
सिकलसेल तपासणी 50, रक्त तपासणी-07
सदर जनजागरण मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रभारी अधिकारी विजय कोल्हे सा.यांचे नेतृत्वाखाली पोउपनि सचिन चौधरी सा.यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच या मेळाव्यास उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार व्यक्त केले. व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले. जिल्हा पोलीस अंमलदार, महीला पो.अंमलदार तसेच सीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक श्री.तायडे व अमलदारांनी विशेष परिश्रम घेतले. सदर जनजागरण मेळाव्यामध्ये एकूण 250 ते 300 नागरिक उपस्थित होते. सर्वांना जेवणाची व्यवस्था करुन मेळाव्याची सांगता करण्यात आली.