पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे :- वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अमृत खान, लिपाणे वस्ती येथे इसम नामे १. आतिश मोहन नातु वय २३ वर्षे, रा. शनिनगर, कचरावत चाळ, गल्ली नंबर २, हर्षदा किरणा मालाचे दुकानाशेजारी, पुणे २. आकाश प्रकाश जाधव, वय २४ वर्षे, रा. मिलारेवाडी, वाघजाई मंदीर, कात्रज, पुणे ३. शिवराज भिमाशंकर कोळी, वय २३ वर्षे, रा. हिंजवडी, आदर्शनगर, साखरे यांचे घरी भाडयाने मुळ गाव अकलकोट, सोलापुर है होंडा सीबी शाईन दुचाकी गाडी या गाडीसह गिळून आल्याने त्यांचेकडे सदर गाडीबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरं ८२० / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची गाडी जप्त करून त्यांना नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन ३ दुचाकी गाडया काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना आरोपीकडुन एक रिक्षा मिळुन आली असुन ती जप्त केली आहे. त्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा उघडकीस आला आहे.. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाने खालील प्रमाणे एकुण ५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरने ८२० २०२२ भादंवि कलम ३७९
२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५२९/२०२२ भादंवि कलम ३७९
- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६५८ / २०२२ भादंवि कलम ३१०९
४.4.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६७४ २०२२ भादंवि कलम ३७९
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८१८ / २०२२ भादंवि कलम ३११९ वरील प्रमाणे आरोगीताकडुन ४ दुचाकी गाड्या व १ रिक्षा असा एकुण २,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार बनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिजीत जाधव, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, रविंद्र चिप्पा, शैलेश साठे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, मितेश चोरमले यांच्या पथकाने केली आहे.

