पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- दिनांक ११/१२/२०२२ शिवस्व मेन्स पार्लर या दुकानासमोर फिर्यादी यांना आरोपी नामे सोन्या कांबळे, व अनोळखी इसम यांनी येवुन फिर्यादी यांना पाणी न दिल्याचे कारणावरून हाताने मारहाण करुन अनोळखी इसमाने त्याचेकडील लोखंडी कोयता फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाच्या डोक्यामध्ये मारुन जखमी केले आहे म्हणुन फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८३१ / २०२२ भादंवि कलम ३०७, ३२३, ५०६, ३४ शस्त्र अधिनियम ४.२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७-१- सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी सोन्या कांबळे याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विक्रम सांवत व आशिष गायकवाड यांना आरोपी सोन्या कांबळे, हा त्याचे राहते घरी आला असुन तो बाहेर गावी पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आदित्य ऊर्फ सोन्या खंडु कांबळे, वय २० वर्षे, रा. कचरावत चाळ साई मंदीराजवळ, हनुमान नगर, आंबेगाव खुर्द, पुणे यास ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
तसेच नमुद गुन्हयातील पाहीजे अनोळखी इसमाबाबत तपास पथकातील अधिकारी सपोनि अमोल रसाळ व पोउनि धिरज गुप्ता हे माहीती घेत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, मितेश चोरगोले, अभिनय चौधरी यांना सदर गुन्हयातील फिर्यादी यांचे डोक्यामध्ये कोयता गारलेला आरोपी व्यंकटेश भंडारी हा असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी व्यंकटेश भंडारी, वय ५२ रा. दत्तनगर, आंबेगाव, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास गुन्हयात अटक केली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सोनाली कथले हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, सोनाली कथले, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, गंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गार्ड, सचिन सरपाले निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड, अभिनय चौधरी, गितेश चोरगोले यांच्या पथकाने केली आहे.