मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- नाशिक जिल्ह्यात दुस-या टप्प्यामध्ये एकूण १९६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे १८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले आणि आज मतमोजणी होत आहे. या निवडणूक निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल ताजे आपण आता जाणून घेऊ या.
नाशिक तालुका निकाल
नाशिक तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाचे निकाल जाहीर झाले आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाने ५ जागा जिंकत वर्चस्व मिळवले. शिंदे गटाला २ तर भाजपला २ जागा मिळाल्या आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली तर दोन अपक्ष सरपंच या निवडणुकीत निवडून आले आहे. शिवसेना शिंदे गट: गिरणारे – किरण कोरडे महिरावणी- कचरू वागळे काँग्रेस: देवरगाव – पर्वता पिंपळेके राष्ट्रवादी काँग्रेस साडगाव – सुरेश पारधे अपक्ष: लाडची – लेखा कळाले बेळगाव ढगा – शरद मांडे
नाशिक तालुका सरपंच निकाल असा आहे.
शिवसेना ठाकरे गट दुडगाव – एकनाथ बेझेकर, सामनगाव – कविता जगताप, ओढा – प्रिया पेखळे, गणेशगाव- मालती डहाळे, तळेगाव – रवींद्र निंबेकर भारतीय जनता पक्ष: यशवंतनगर – अगस्ती फडोळ, एकलहरे – अरुण दुशिंग,
नाशिक जिल्ह्यातील अन्य महत्त्वाचे निकाल.
- मुंढेगाव सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर विजयी
- वासाळी सरपंचपदी सुनीता कोरडे यांची निवड
- आशेवाडी सरपंच पदी साहेबराव माळेकर विजयी
- पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे भास्कर बनकर २१३ मतांनी विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांचे पुतणे गणेश बनकर यांच्यासह भाजपचे सतीश मोरे यांचा पराभव
- पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदावर भास्कर बनकर विजयी. भास्कर बनकर गटाचे १२ सदस्य विजयी. भाजपच्या सतिश मोरे गटाचे ४ सदस्य विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर गटाला फक्त एकच जागा. अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे माजी सभापती राजेश पाटील यांच्या पत्नी, छाया पाटील व भाजपाचे सतिश मोरे यांच्या पत्नी शितल मोरें निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेचे किरण लभडे यांच्या पत्नी रेखा लभडे विजयी झाल्या.
- उमराळे बुद्रुक येथे जनसेवा पॅनलची बाजी. शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख विलास केदार व ज्येष्ठ नेते जे डी केदार यांच्या पॅनलला मोठे यश. सर्व उमेदवार विजयी .
- निळवंडी सरपंच पदासाठी चारोस्कर विजयी
- शिंगवे येथे गोकुळ गीते यांच्या जय मल्हार पॅनलला मोठे यश. ११ जागांसह सरपंचपदाचे उमेदवार विजयी
- येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. कोटमगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष पराभूत
- मालेगाव ग्रामपंचायत जाटपाडे ग्रामपंचायत थेट सरपंचपद.. काका-पुतण्याच्या लढाईत काकाची सरशी. काका भागचंद तेजा यांचा विजय तर पुतण्या ज्ञानेश्वर तेजा पराभू
- निळवंडी येथे परिवर्तन पॅनल ची बाजी
- कोकणगाव खुर्द सरपंच पदी यशवंत डंबाळे विजय
- शिवसेना नेते नितीन आहेर यांची वडाळीभोई ग्रामपंचायत सरपंचपदी निवड
- पेठ तालुका ग्रामपंचायत निरगुडे (क) सरपंचदी बेबीनंदा सुरेश खंबाईत यांची थेट निवड
श्रीमंत ग्रामपंचायत नागापूरचा निकाल असा
मनमाड पासून जवळच असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र पवार हे थेट सरपंचपदी ९०३ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार तर रघुनाथ सोमासे यांचा पराभव झाला. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मोजक्या श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक नागापूर ही ग्रामपंचायत आहे. त्यामुळे येथील निवडणूक राज्यभर चर्चेत होती. या ग्रामपंचायतीचा निकाल अखेर लागला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वत सरपंचपदाच्या निवडणुकीत होते. तर त्यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे होते. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेची ठरली. रविवारी या नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान झाले. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत झाली. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त तिसरे पॅनलही येथे होते. त्यामुळे येथे कोणाच्या हाती सत्ता जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
नांदगाव तालुक्यात थेट सरपंचपदी निवड झालेले उमेदवार असे - बोयेगाव – बबन पोपट शेरमाळे
- लोढरे -ज्योती प्रमोद निकम .शिंदे गट
- हिरेनगर – मंगला श्रावण बिन्नर शिंदे गट
- धोटाने खुर्द – शरद अशोक काळे
- लक्ष्मीनगर – मीराबाई शंकर उगले
- भार्डी – अनिता अशोक मार्कंड
- हिसवळ – शांताराम पवार
- मुळडोंगरी – जन्याबाई पवार
- धनेर – मनीषा वाघ
-पिंपखेड – जीवन गरुड - तळवाडे – शीतल निकम
सिन्नर तालुक्यातील हे आहे थेट सरपंच
सिन्नर – सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल लागले असून यात ठाणगाव, डूबेरेवाडी, वडगाव पिंगळा, लोणारवाडी व कारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाचे थेट सरपंच निवडून आले. तर शहा, सायाळे, पाटपिंप्री, उजनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव गटाचे सरपंच निवडून आले आहेत.
सिन्नर तालुक्यातील हे आहे थेट सरपंच
नांदूरशिंगोटे – शोभा बरके,
शहा- संभाजी जाधव,
सायाळे- विकास शेंडगे,
पाटपिंपरी- नंदा रमेश गायकवाड,
किरतांगळी- कुसुम शांताराम चव्हाणके,
डुबेरेवाडी- दत्तू गोफणे,
कारवाडी- रूपाली निलेश जाधव,
वडगाव पिंगळा- शेवंताबाई गेनू मुठाळ,
लोणारवाडी- जयश्री सदाशिव लोणारे,
आशापुर- सुलोचना सिताराम पाटोळे,
ठाणगाव- नामदेव शिंदे, तर
उजनी- निवृत्ती लहानू सापनर
निफाड तालुका सरपंचपदाचे विजयी उमेदवार
पिंपळगांव ब. – भास्कर बनकर ठाकरे गट
निमगांव वाकडा – पूजा दरकरे – राष्ट्रवादी
थेटाळे – शितल शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस
तारुखेडले – अनुसया आंधळे – ठाकरे गट
खानगांव थडी – भाऊसाहेब दौंड – भाजप
दिक्षी – योगेश चौधरी ठाकरे गट
खडक माळेगांव -जगदीश पवार अपक्ष
नांदर्डी -जयश्री जाधव राष्ट्रवादी
कोटमगांव – आरती कडाळे भाजपा
लोणवाडी – पल्लवी साळवे राष्ट्रवादी
बोकडदरे – विजय सानप राष्ट्रवादी
कसबे सुकेणे- आनंदा भंडारे अपक्ष
कोकणगांव- सुरेखा मोरे
मांजरगांव- वंदना सोनवणे अपक्ष
पिंपळस- निशा ताजने भाजप
साकोरे मिग- शोभा बोरस्ते राष्ट्रवादी
शिंगवे -सुशीला पवार अपक्ष
सोनेवाडी खु. -नंदा आव्हाड राष्ट्रवादी
धारणगांव- वीर दिपक सोनवणे राष्ट्रवादी
चांदोरी- विनायक खरात ठाकरे गट

