✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील काचनगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचा सह संपूर्ण पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय झाल्यानंतर सर्वांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या निवास स्थानी भेट घेऊन जल्लोष साजरा केला. तसेच त्यावेळी नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व जनतेने दिलेल्या संधीचा वापर जनसेवेसाठी प्रामाणिक पणे करा आणि कुठे अडचण गेल्यास मी तुमच्या सोबत आहे असा शब्द त्यावेळी त्यांनी दिला.
नवनियुक्त सरपंच पदी नंदा गजानन चिंचुलकर सह ग्रामपंचायत सदस्य सीमा रघाटाटे, आशा ढाबर्डे, लता धनवीज, सुदर्शन वैद्य, राजेंद्र पवार, कमल आत्राम, हनुमान आष्टांकर, सम्राट मुरार, अमोल खोडे (अपक्ष) या सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन केले.

