विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राहाता:- आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या जील्हा कौंसील सदस्य जयश्रीताई गुरव यांची देशातील कामगारांच्या हक्कासाठी लढनारी सर्वात मोठी संघटना ऑल इंडीया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीनीवर नुकतीच निवड करण्यात आली.
20 नोव्हेंबरला कोल्हापूर मध्ये झालेल्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड करण्यात आली. त्या निमित्त कोल्हार मधील प्राथमीक आरोग्य केंद्रात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन आशा सुपरवायझर सौ. वर्षाताई मांडुळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळेस सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र वर्पे जील्हा संघटक व राज्य कार्यकारीनि सदस्य कॉ. सुरेश पानसरे उपस्थीत होते.
सदर प्रसंगी सौ जयश्रीताई गुरव यांनी सर्व आशांचे व गटप्रवर्तक यांचे आभार मानले मला राज्य कार्यकारीनीवर घेऊन संघटनेने जो विश्वास दाखवीला त्या बदल मि अँड सुधिर टोकेकर व कॉ सुरेश पानसरे यांचे आभार मानते तुमच्या व माझ्या प्रश्नांन साठी मला संघटनेत काम करत असताना तुम्हा सर्व आशा भगीनींची साथ हवी आहे. तुम्ही मला साथ दिली तर आपन एकजुटीने आपले प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवुन घेऊ असा मला विश्वास आहे त्यावेळी म्हणाल्या . तेव्हा आपले काहीजरी मतभेद असले तरी आपन एक दिलाने संघटीत राहून काम करू असे सौ. जयश्री गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आशा सुपरवायझर सौ. वर्षा मांडुळे यांनी सर्व आशा व आम्ही गट प्रवर्तक देखील तुमच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहु असे त्यांनी आपल्या भाषण प्रसंगी सांगीतले. या प्रसंगी आयटकचे राज्य कौंसील सदस्य कॉम्रेड सुरेश पानसरे यांचा केरळ मधील आलपुज्जा येथे राष्ट्रीय अधिवेशनात आशांना अठरा हजार रुपये व गट प्रवर्तकांना एकविस हजार रुपयाची मागनी करनारा ठराव मांडला त्या बदल त्यांच्या देखील आशा व गट प्रवर्तक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी आयटकच्या जील्हा कौंसील मेंबर सौ. अश्विनी गोसावी तसेच आशा विमल भोसले निर्मला राजभोज शशिकला गायकवाड ज्योती थोरात पुष्पा लोखंडे मंगल बर्डे हनुमंतगाव दाढ व कोल्हार पि एच सि अंतरगत येणाऱ्या आशा उपस्थित होत्या. शेवटी सौ अश्विनी गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

