उर्वरित पदभरती प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे सुतोवाच.
अधिसंख्य कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत सरकार गंभीर्या नाही.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दिनांक 21 डिसेंबर रोजी नागपूर येथे निघालेल्या आदिवासी जनआक्रोश मोर्चा विधानसभेच्या अधिवेशनावर धडकला होता. यामध्ये राज्यातील लाखो आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दरम्यान शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांची भेट घेतली असता. विविध विषयावर चर्चा झाली.
यामध्ये बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई च्या ऐवजी त्यांना संरक्षण देण्याचं कारण काय ? असे शिष्टमंडळाने विचारले असता याबाबत मंत्र्यांनी त्या प्रश्नाला टाळलं असल्याचे निरदर्शनास आले. इतर विषयावर सविस्तर चर्चा झाली असून मूळ मुद्दा अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा महत्वाचा आहे.
म्हणुन जानेवारी महिन्यात काँटेंप ऑफ कोर्ट संदर्भात नागपूर येथे सर्व संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. आदिवासी संघर्ष कृती समिती, नागपूर.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

