महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ओझर खुर्द:- नुसतीच ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये दणदणीत यश प्राप्त केलेल्या उमेदवाराचा सत्कार समारभ राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होतो.
दिनांक 24 रोजी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मारगदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या शेतकरी विकास पॅनलच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात करून त्यासर्व ग्राम पंचायत सदस्य आणि सरपंच यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गावात दारूबंदी, स्मशान भूमीचे कार्य, तंटामुक्ती अशी महत्वाची कामे आता गावा मध्ये नक्की पूर्ण होतील व गावाचा विकास होईल आशी आशा ओझर खुर्द ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या सत्कार समारंभ प्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, इंद्रजीतभाऊ थोरात, रणजितदादा देशमुख, जयश्रीताई थोरात व आदी इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील शेकडो नागरिकासह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

