Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे येथील अनाथ आश्रमाला मध्यरात्री लागली भीषण आग, 100 मुले थोडक्यात बचावले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 27, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे येथील अनाथ आश्रमाला मध्यरात्री लागली भीषण आग, 100 मुले थोडक्यात बचावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पुणे:-
येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील तय्यबीया अनाथ आश्रमाला भीषण आग लागल्याचा घटनेने संपूर्ण पुणे हादळल आहे. ही भीषण आग मध्यरात्री 12:45 वाजताच्या सुमारास लागली असल्याची माहिती मिळत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेत तब्बल 100 पेक्षा जास्त मुले या आगीतून बाचावली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कॅम्प परिसरातील तय्यबीया अनाथ आश्रमाला भीषण आग लागली लगेच आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान दाखल होत त्यांनी आश्रमातील मुलांना सुखरूप बाहेर काढले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

कॅम्प परिसरात ईस्ट स्ट्रीट मार्गावरील तय्यबीया अनाथ मुलांचे आश्रम आहे. या आश्रमाला मध्यरात्री 12:45 वाजताच्या सुमारास आग लागण्याची मागणी अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. महानगर पालिका आणि मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.

ही घटनास्थळी पोहोचताच तय्यबीया अनाथ मुलांच्या आश्रम (ट्रस्ट) या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. आगीमुळे मोठा धुर झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास १०० मुलांना आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवले. तसेच आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला.

या आगीमधे इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे व इतर काही साहित्याचे नुकसान झाले आहे. आग मध्यम स्वरुपाची असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वाहनचोरी करणा-या सराईत चोरास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद, त्याचेकडुन चोरीच्या ०३ दुचाकी केल्या जात.

Next Post

2012 पासून शासनाची बंदी असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शिक्षण सेवक म्हणून परमनंट झाली कशी?

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
2012 पासून शासनाची बंदी असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शिक्षण सेवक म्हणून परमनंट झाली कशी?

2012 पासून शासनाची बंदी असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शिक्षण सेवक म्हणून परमनंट झाली कशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In