राज शिर्के मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याबद्दल एक खळबजनक माहिती समोर आली आहे. या मुळे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार असे चित्र दिसून येत आहेत.
मे 2012 पासून शासनाने शिक्षण सेवकाना कायम करण्यास बंदी घातलेली असताना देखील विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी शिक्षण सेवक म्हणून कायम परमनंट करण्यात आल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून मागवलेल्या माहिती मधून समोर आली आहे. बारामतीचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे.
या माहितीनुसार, राज्यात शिक्षक भरतीवर राज्य शासनाने रितसर 2 मे 2012 पासून बंदी घातलेली असताना देखील विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मुलगी श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार यांनी 16 ऑगस्ट 2018 रोजी शिक्षण सेवक म्हणून कायम नेमणूक करण्यात आली आहे.
तर ही नेमणूक करत असताना शिक्षण सेवक म्हणून कायम (परमनंट) करण्यासाठी जे टिईटी प्रमाणपत्र बंधनकारक असते ते टिईटी प्रमाणपत्रच शासनाकडे उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. म्हणजेच टिईटी प्रमाणपत्राविना अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम नेमणूक झाली आहे.
तसंच त्यांनी शासनास सादर केलेल्या आधार कार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्नतारखांचा वेगवेगळा उल्लेख आढळुन येत आहे. तर दुसऱ्या मुलीची माहितीच त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे आता अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348