🖊️आशिष अंबादे , वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मधून एक खळबजनक बातमी समोर येत आहे. अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिला गर्भधारणा झाल्याने या संतापजनक घटनेला वाचा फुटली.
एका १४ वर्षीय अल्पवयीन मूलीचे लग्न करण्यात आले. पीडिता गर्भवती राहिल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याची माहिती दिली.
हिंगणघाट शहरातील रहिवासी अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी फुला देसू कुराडे वय ५० वर्ष हिने आरोपी जिवन रामकिसन देवतळे वय ३५ वर्ष याच्याशी बालविवाह लावून दिला. आरोपी जीवन याने पीडितेवर वारंवार अत्याचार करुन तिला गर्भवती केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक व समाजमन सुन्न करणारा प्रकार उजेडात आला. याप्रकरणाची माहिती तत्काळ हिंगणघट येथील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीचे बयाण नोंदवून आरोपी जिवन देवतळे आणि फुला देसू कुराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली. पीडितेवर हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.