मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील देवलमरी येथे न्यू स्टार क्रीडा मंडळाकडून व्हॅलीबाल सामान्याचे आयोजन करण्यात आले. या व्हॅलीबाल सामान्याचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला.या सामान्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सामान्यातील विजयी संघाना करण्यात आले.देवलमरी येथे आयोजन व्हॅलीबाल सामान्याचे विजयी संघांना प्रथम पुरस्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत देवलमरी कडून देण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी सरपंच विजय कुसनाके, महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, जूलेख शेख, नरेंद्र गर्गम, अक्षय अलेवार, गोपाल लेकुर, शंकर चालुरकर, संजय गोंडे, सुधाकर लेकुर, गणेश गदास्वार, सुधीर बामणकर, रमेश तोकला, वैकुनटम इसंकर, रवी पानेम, व्यंकटेश पानेम, अक्षय सडमेक, मुकेश गांडला, सुधीर बीचाला, अजय मारीन, प्रमोद आत्राम, हरीश गांडला, पोचम गांडला, सत्यराज गौडेवार, सुरेश काटेल व समस्त गावकरी मंडळाचे पदाधिकारी उपास्थित होते.
या व्हॅलीबाल समान्याचे यशस्वी आयोजनासाठी न्यू स्टार क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गणांनी अथक परिश्रम घेतले उदघाटन व बक्षीस वितरण सोहळ्याला क्रीडाप्रेमीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

