सचिन पावरा, जळगाव प्रतिनिधी
चोपडा,दि 26 डिसेंबर:- रोजी आदिवासी क्षेत्रात वसलेले एक छोटसं गाव कर्जाणे तालुका चोपडा जिल्हा जळगाव नवीन पिढी युवाचे सरकार निवड झाल्यापासून धडक निर्णय करताना दिसत आहे. गावामध्ये आत्तापर्यंत चोऱ्या, भांडणे, महिला छेडछाड, युवा पिढी नशेत असे अनेक परिणाम या गावांमध्ये होताना दिसत होते तरी समाजावर, शिक्षित मुलांवर असे अनेक परिणाम या गावठी व बनावठीदारू मध्ये घडत होताना दिसत होता. तरी महिलांचा वारंवार ग्रामपंचायत मध्ये तक्रार येत असताना युवा नेतृत्व दारूबंदी करण्याच्या निर्णय विचार केला. म्हणून या अवैध खरेदी-विक्री करणारे दुकानदारांना आज संपूर्णपणे बंद करण्याचे निर्णय दि 24 डिसेंबर रोजी महिला ग्रामसभेत आयोजन करून सर्वांना मते ठराव मंजूर करण्यात आले.
दि 26 डिसेंबर रोजी महिला ग्रामसभेचा ठराव चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आणि चोपडा कार्यालयाचे नायब तहसीलदार, सरपंच श्रीमती अलका सतीश बारेला उपसरपंच प्रमोद बारेला सदस्य अनारसिंग बारेला व मुन्नाभाई धरमसिंग बारेला व महिला व जेष्ठ महिला च्या उपस्थित हा ठराव देण्यात आला.

महिला ग्रामसभेचा अशा प्रकारचा ठराव पास केल्याने गावातील नागरिक आनंद व्यक्त केला. या ठरवामुळे गावातील अवैध धंदे बंद होऊन युवा तरुण वाम मार्गाला लागणार नाही. असे मत अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

